yuva MAharashtra तृतीयपंथीयांना रेशनकार्डाचे वाटप; धान्याचा लाभ देणार

तृतीयपंथीयांना रेशनकार्डाचे वाटप; धान्याचा लाभ देणार

सांगली टाईम्स
By -

सांगली : तृतीयपंथीयांना रेशनकार्डाचे वाटप करताना जिल्हाधिकारी काकडे.

सांगली / प्रतिनिधी

महसूल दिनानिमित्त तृतीयपंथीयांसाठी प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत धान्याचा लाभ देण्यात येणार आहे. यासाठी तृतीयपंथीयांना रेशन कार्डचे वाटप जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याहस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात झाला.

गोरगरीब जनतेला राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत धान्याचा लाभ देण्यात यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी काकडे यांनी यावेळी केले. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलके, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी रूपाली सोळंके, सांगलीचे पुरवठा निरीक्षक राजू कदम आदी उपस्थित होते.
Tags: