सांगली / प्रतिनिधी
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली यांच्यावतीने कर्नाळ हायस्कूल, कर्नाळ येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक जनजागृतीपर शिबीर संपन्न झाले. या शिबीरास कर्नाळ गावच्या सरपंच संध्याताई कांबळे, ग्रामविकास अधिकारी जमीर पटेल, मुख्याध्यापक पंडीत मोरे, ग्रामपंचायत सदस्य राजू पाटील व इतर सदस्य उपस्थित होते.
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांनी मुलांविषयीचे व महिलांबाबतचे कायदे, मनोधैर्य व कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारे लैगिंक अत्याचार कायदा, या कायद्यामध्ये किती शिक्षा व दंड आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले, विधी सेवा प्राधिकरणाचे कामाचे स्वरूप व कोणास विधी सेवा हवी असल्यास जिल्हा विधी सेवा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहान त्यांनी यावेळी केले.ग्रामविकास अधिकारी जमीर पटेल यांनी शासकीय योजनांची माहिती दिली. तसेच जिल्हा परिषद अंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृती व बालकांना मिळणारे मोफत शिक्षण या विषयी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक मुख्याध्यापक पंडीत मोरे यांनी केले. यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मधारी, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकमाचे नियोजन कर्नाळ हायस्कूलचे मुख्याध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.
