◼️ आता आर या पार आंदोलन
◼️मनोज जरांगे - पाटील यांचा आरोप
सांगली / प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी आग्रही भूमिका घेणाऱ्या मनोज जरांगे - पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यांनी चलो मुंबईची हाक दिली आहे. मुंबईत गेल्यावर आरक्षण घेणारच असा इशारा पाटील यांनी दिली आहे. दरम्यान माझ्यावर हल्ला करण्याचा डाव असल्याचा सनसनाटी आरोपही त्यांनी केला आहे. पाटील विरुद्ध सरकार यामध्ये आगामी कळतं तीव्र संघर्ष होण्याची शक्यता आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी पाटील यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी उपोषणाचे हत्यारही उपसले होते. मात्र सरकारने वेळ मागितल्यानंतर त्यांनी उपोषण स्थगित केले होते. मात्र आता त्यांनी थेट मुंबईत धडकण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातलं राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. ऐन गणेशोत्सव काळात जरांगे - पाटील लाखो मराठा बांधवांसह मुंबईत येणार असल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे.
सत्ताधाऱ्यांसह लक्ष्मण हाके यांच्याकडून जरांगे यांना टार्गेट केले जात आहे. त्यामुळे पाटील यांचा मोर्चा मुंबईत आल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रयत्न निर्माण होऊ शकतो, असे जाणकारांचे मत आहे. दरम्यान मोर्चा दरम्यान माझ्यावर हल्ला होऊ शकतो असा आरोप जरांगे यांनी केला आहे. फडणवीस यांनी मराठ्यांना हलक्यात घेऊ नये असेही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
