yuva MAharashtra पृथ्वीराज पाटील यांचा राजीनामा

पृथ्वीराज पाटील यांचा राजीनामा

सांगली टाईम्स
By -


◼️बुधवारी भाजपमध्ये प्रवेश

◼️ पृथ्वीराज पाटील समर्थकांसह मुंबईकडे रवाना

सांगली / प्रतिनिधी

काँग्रेस पक्षाने अनेक वेळा संधी दिली. मी पक्षाचा ऋणी आहेे. पण सांगलीच्या हितासाठी आणि विकासाला चालना देण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करत आहे. देवेंद्र डणवीस यांच्या नेतृत्वाखाली मला राजकारणात यश येईल असे म्हणत काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. मंगळवारी त्यांनी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. बुधवारी ते मुख्यमंत्री देवेंद्र डणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

शांत, संयमी आणि स्वच्छ प्रतीमेचा नेता म्हणून पृथ्वीराज पाटील यांची ओळख आहे. अत्यंत कठीण काळात त्यांनी महापालिका क्षेत्रातील काँग्रेस जीवंत ठेवण्याचे काम केले. दादा घराण्याने काँग्रेसला वार्‍यावर सोडल्यानंतर खर्‍या अर्थाने पाटील यांनी सांगलीतील काँग्रेसला नवसंजीवणी दिली. पक्षाचे कार्यक्रम पार पाडले. अनेक उपक्रम राबविले. याच जोरावर त्यांनी जनतेशी संपर्क वाढवला. दोन वेळा सांगली विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली. पण दोन्ही वेळेस काँग्रेसच्याच स्थानिक नेत्यांमुळे त्यांचा पराभव झाला.

मी काल काँग्रेसमध्ये होतो, उद्या भाजपमध्ये असेन, मात्र माझ्यासाठी सांगलीचे हित हे सर्वप्रथम असेल. काँग्रेसने मला अनेक संधी दिल्या, साथ दिली. मी या पक्षाचा ऋणी आहे. मी राजकारण, समाजकारण काँग्रेसमध्येच शिकलो. विकासाला गती देण्यासाठी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मला त्यात यश येईल, असा विश्वास आहे. ज्यांनी मला आजवर साथ दिली, त्यांना मी कधीच अंतर देणार नाही. माझ्या खांद्याला खांदा लावून लढणारे कार्यकर्ते ही माझी ताकद आहेत. काही लोक माझ्यासोबत येऊ शकणार नाहीत, मात्र विकासाच्या प्रक्रियेत मी त्यांच्या पाठीशी उभा असेल.
शहकाटशहाच्या राजकारणाचे ते बळी ठरले. विधानसभा निवडणूकीपासून ते पक्षावर विशेषतः स्थानिक नेत्यांवर नाराज होते. त्यांना डावलले जात असल्याने त्यांच्या नाराजी मध्ये भर पडली. अखेर त्यांनी भाजप नेत्यांशी संपर्क वाढवला. रविवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, आमदार प्रवीण दरेकर यांनी पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब केले. अखेर बुधवार 13 ऑगस्ट रोजी त्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र डणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे. मंगळवारी त्यांनी आपल्या काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.


Tags: