yuva MAharashtra सुजित काटेंचे सामाजिक, राजकीय काम कौतुकास्पद

सुजित काटेंचे सामाजिक, राजकीय काम कौतुकास्पद

सांगली टाईम्स
By -

 

संजयनगर (सांगली) येथे सुजित काटे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण. बाजूस पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुजित काटे. 

◼️प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

◼️संजयनगरमध्ये जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन


सांगली / प्रतिनिधी
झोपडपट्टी पुनर्वसन समिती, गुंठेवारी समितीच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी अहोरात्र झटणारा कार्यकर्ता म्हणून सुजित काटे यांची ओळख आहे. त्यांचे सामाजिक, राजकीय काम कौतुकास्पद आहे. मंत्रालयापर्यंत त्यांच्या नावाचा बोलबाला आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण यांनी येथे बोलताना काढले. श्री. चव्हाण यांच्या हस्ते काटे यांच्या संजयनगर येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. 

यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्यासह सर्व भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष चव्हाण सोमवारी सांगली दौऱ्यावर होते. चव्हाण म्हणाले, सुजित काटे नाव मंत्रालयापर्यंत पोहचले आहे. झोपडपट्टीधारकांचा विषय त्यांच्यामुळे मार्गी लागला आहे. महापालिका क्षेत्रातील ८० झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या हक्काचे मालकीचे उतारे मिळणार आहेत. यासाठी काटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वेळोवेळी उपोषण, मोर्चे, आंदोलने केली आहेत. त्याचे हे यश आहे.

भारतीय जनता पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असलेले काटे लवकरच सांगली महापालिकेच्या सभागृहात दिसतील असे सांगत चव्हाण म्हणाले, काटे यांचा गुंठेवारीधारकांसाठीही लढा सुरू आहे. त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सुटण्यास मदतच होईल. त्याचा फायदा पक्षालाही होणार आहे. कोणतेही काम असो त्यांनी थेट मुंबईला यावे. काम मार्गी लावले जाईल अशी ग्वाहीही चव्हाण यांनी यावेळी बोलताना दिली

Tags: