◼️सामाजिक कार्यकार्ते संदीप दळवी यांची मागणी
◼️आयुत सत्यम गांधी यांना निवेदन
सांगली / प्रतिनिधी
शामरावनगर येथील महसुल कॉलनी मध्ये शहरी प्राथमिक उपआरोग्य केंद्राचे बांधकाम चालू आहे. ज्या जागेवर बांधकाम चालू आहे ती महापालिकेची नाही. तशी ७/१२ पत्रकी नोंद नाही. जमीन भोगवटदार २ मध्ये नोंद आहे. नागरिकांची मागणी नसतानाही सुरू असलेल्या या बांधकामाची चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप दळवी यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन त्यांनी आयुक्त सत्यम गांधी यांना दिले आहे. या मध्ये असे म्हटले आहे की, नागरिकांना गरज नसताना हे आरोग्य केंद्र कोणाच्या कोट कल्याणासाठी होत आहे. याची चौकशी करावी. उपआरोग्य केंद्र हे बांधत असताना सदर खुल्या भूखंडावर महापालिकेचे ७/१२ पत्रकी नोंद नाही. सदरची जमीन ही भोगवटदार वर्ग-२ मध्ये समाविष्ट आहे. सदर इमारती बांधकाम परवानगी आहे काय? शामरावनगर भाग हा पूरग्रस्त भाग आहे. या भागात कोणतेही बांधकाम होत असताना महापालिका, प्रशासन, पार्किंगची अट घालून बांधकाम करणेस सांगते. मग सदरचे उपआरोग्य केंद्र रोडलेवलला बांधकाम चालू आहे.
सदरचे आरोग्य केंद्र हे दुसऱ्या जागेत मंजूर झाले असता, इतरत्र बांधले जात आहे. कारण सदरच्या फाईलमध्ये बांधकाम करण्याच्या नकाशामध्ये तफावत आहे. शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्र. ३ या उपकेंद्रापासून ५०० मीटर अंतरावर आहे. या भागात कोणतेही क्रिडांगण अथवा बगीचा नाही म्हणून नागरिकांनी मागील नगरसेवकांना याठिकाणी बगीचा अथवा क्रिडांगण करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यांनी पण येथे बगीचा उभारणार असे सांगून आरोग्य केंद्र उभारले जात आहे. यामागील गौडबंगल आपण शोधून काढावे. या उपआरोग्य केंद्राची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

