yuva MAharashtra ढोल ,ताशा, लेझिम, फुलांच्या वर्षावात विद्यार्थ्यांचे स्वागत

ढोल ,ताशा, लेझिम, फुलांच्या वर्षावात विद्यार्थ्यांचे स्वागत

सांगली टाईम्स
By -




◼️येळवण जुगाई शाळेचा उपक्रम 

◼️पाठ्यपुस्तकांचेही वाटप

येळवण जुगाई / प्रतिनिधी
 
शाहूवाडी च्या पश्चिम भागातील दुर्गम डोंगरी शाळेमध्ये नवागत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव शाळेच्या पहिल्या दिवशी विविध उपक्रम अनेक ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात फुलांच्या उधळीनेने नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. अनुस्कुरा, मांजरे, कुंभवडे ,गावडी,गेळवडे, भाततळी आदी शाळेतून नवागत विद्यार्थ्यांचे विविध उपक्रमाने स्वागत करण्यात आले .

येळवण जुगाई येथील जुगाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, माध्यमिक  उच्च माध्यमिक विद्यालयात या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या नवागताचे स्वागत लेझिम ढोल ताशाच्या गजरात जुगाई देवालय ते शाळे पर्यत वाजत गाजत विद्यार्थाचे जल्लोषी वातावरणात स्वागत करण्यात आले.
नवागत विद्यार्थ्याना शाळेचे मुख्याधापक ए.जी कांबळे यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य देवून स्वागत करण्यात आले मध्यान्ह भोजनात मिष्टान्न देवून विद्यार्थ्याना शालेय पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले. 

यावेळी श्री स्वामी समर्थ फाऊंडेशन चे सचिन काटकर व वैभव काटकर यांनी श्री जुगाई विद्यार्थी वसतिगृहातील गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य व शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विश्वास गुरव, अनिल भोसले, अश्विनी पाटील भक्ती, वायकूळ. सर्व शिक्षक शिक्षककेत्तर कर्मचारी विद्यार्थी वसतीगृह अधिक्षक संजय लाड आदी उपस्थित होते.

Tags: