yuva MAharashtra विद्यार्थ्यांवर हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसे आक्रमक

विद्यार्थ्यांवर हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसे आक्रमक

सांगली टाईम्स
By -

 

 सांगली : शाळेत निवेदन देताना सुरेश टेंगले, रोहित घुबडे-पाटील, प्रल्हाद ढगे, विजय मौर्य, अमित पाटील, साहिल पटवेगार आदी.

◼️शाळांमध्ये सक्ती करु नये 
◼️विविध शाळांना निवेदन

सांगली / प्रतिनिधी

विद्यार्थ्यांवर सक्तीने तिसरी भाषा (हिंदी) लादण्याच्या शासनाच्या निर्णयाविरुध्द महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्र मक झाली आहे. शासनाकडून लेखी आदेश प्राप्त होईपर्यंत शाळांनी कोणत्याही प्रकारे तिसऱ्या भाषेच्या (हिंदी) शिकवणीस किंवा पाठ्यपुस्तक वितरणास सहकार्य करु नये, अशी मागणी केली आहे. याबाबत मनसेचे शहराध्यक्ष सुरेश टेंगले यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध शाळांना याबाबतचे निवेदन दिले आहे.

मनसेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून तिसऱ्या भाषेच्या शिकवणीसंदर्भात शिक्षण विभागामार्फत काही गोंधळजनक निर्णय व माहिती प्रसारित झाली आहे. काही शाळांमध्ये मराठी, इंग्रजी, हिंदी या तीनही भाषा सक्तीने शिकवल्या जाण्याच्या हालचाली सुरु आहेत. तर काही ठिकाणी शासनाने केवळ दोन भाषाच शिकवायच्या असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत अद्याप स्पष्ट आणि लेखी आदेश उपलब्ध नसताना काही शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची पुस्तके छापण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.

महाराष्ट्रात विद्यार्थ्यांवर सक्तीने तिसरी भाषा म्हणून हिंदी लादणे, हे राज्यातील भाषिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक हिताला प्रतिकूल आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर अतिरिक्त भाषेचे ओझे टाकणे, त्यांच्या मन:स्वास्थ्यावर आणि अभ्यासक्र माच्या प्रभावावर विपरित परिणाम करणारे आहे. शासनाकडू कोणताही स्पष्ट आदेश नसताना, शाळांनी अशा सक्तीच्या आदेशाचे पालन करु नये. त्यामुळे जोपर्यंत शासनाकडून लेखी आदेश प्राप्त होत नाहीत, तोपर्यंत कोणतीही नवी शैक्षणिक सक्ती लागू करु नये असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर मनसेचे शहराध्यक्ष सुरेश टेंगले, उपाध्यक्ष रोहित घुबडे-पाटील, सचिव प्रल्हाद ढगे, विजय मौर्य, अमित पाटील, साहिल पटवेगार, अमर औरादे आदींसह मनसेचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: