yuva MAharashtra माजी जिल्हापरिषद सदस्य भीमराव माने रयत क्रांती संघटनेत

माजी जिल्हापरिषद सदस्य भीमराव माने रयत क्रांती संघटनेत

सांगली टाईम्स
By -



◼️संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांच्या उपस्थित प्रवेश

सांगली / प्रतिनिधी
कवठेपिरान (ता. मिरज) येथील माजी सरपंच, जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने यांनी रयत क्रांती संघटनेत प्रवेश केला आहे. संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत, संघटनेचे अध्यक्ष सागर खोत यांच्या उपस्थित त्यांनी प्रवेशाची घोषणा केली. कवठेपिरान येथे लवकरच भव्य शेतकरी मेळावा घेत याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल असे माने यांनी यावेळी बोलताना सांगितले.

आदर्श सरपंच म्हणून माने यांनी कवठेपिरान मध्ये उल्लेखनीय काम केले. गावात तब्बल १३ वर्षे दारूसह अवैध व्यवसाय बंद करत जिल्ह्यासह राज्यात दबदबा निर्माण केला होता. त्यानंतर जिल्हापरिषद सदस्य म्हणूनही त्यांनी चांगले का केले. पण गेल्या काही वर्षापासून ते वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम केले. माजी राज्यमंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत आणि त्यांची कायमच मैत्री राहिली आहे. 

रविवारी माने यांनी आमदार खोत यांच्या उपस्थितीत रयत क्रांती संघटनेत प्रवेश करत असल्याची घोषणा केली. पुढील रविवारी कवठेपिरान येथे भव्य शेतकरी मेळावा घेऊ. या मेळाव्यात पक्ष प्रवेशाबाबत अधिकृत घोषणा करू, असे माने यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 
Tags: