◼️आमदार सुधीर गाडगीळ
◼️ इंदिरानगर झोपडपट्टीपासून शुभारंभ
सांगली / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या रेट्यामुळे महापालिका प्रशासनाने महापालिका क्षेत्रातील झोपड्यांचे मोजमाप करण्यास अखेर सुरवात केली आहे. शुक्रवारी प्रभाग क्रमांक १८ मधील इंदिरानगर झोपडपट्टी पासून याची सुरवात करण्यात आली. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, महापालिकेच्या उपयुक्त स्मृती पाटील, माजी समाजकल्याण समिती सभापती स्नेहल सावंत, संघटनेचे अध्यक्ष सुजित काटे, संघटन प्रमुख सूरज पवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, झोपडपट्टी पुनर्वसन समितीने अनेक वेळा मोर्चे, आंदोलन, उपोषणाच्या माध्यमातून झोपपट्टीधारांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. अध्यक्ष सुजित काटे आणि त्यांच्या टीमच्या चिकाटीमुळे झोपडपटीधारकांना मालकी हक्कांचे उतारे मिळण्याचे मार्ग मोकळे झाले आहेत. महापालिका स्केत्रातील सर्वच झोपड्यांचे मोजमाप टप्प्याटप्प्याने होईल. झोपडीधारकांना याचा फायदा होईल. प्रत्येक शासकीय योजनांचा भविष्यात लाभ मिळेल. यावेळी संघटनेचे रवींद्र सदामते, अर्जुन मजले, श्रीराम सासणे यांच्यासह मनपाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
