◼️आमदार गोपीचंद पडळकर
◼️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
सांगली / प्रतिनिधी
आटपाडी येथील बाबासाहेब देशमुख सहकारी सूतगिरणीला कागदोपत्री तोट्यात दाखवून, काही लालची लोकांनी ती गिळंकृत करण्याचा घाणेरडा डाव आखला आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक व वस्त्रोद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा घोटाळा उघडपणे सुरू आहे, याची तत्काळ चौकशी करावी अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.
आमदार पडळकर म्हणाले, सहकारी संस्थांना लुबाडणाऱ्या भांडवलशाही प्रवृत्तीचा पर्दाफाश करावा. बेकायदेशीर व्यवहार रद्द करून जबाबदारांवर कारवाई करावी शेतकऱ्यांच्या आणि सूतगिरणीच्या हितासाठी तातडीने न्याय मिळावा. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि बेकायदेशीर व्यवहार त्वरित रद्द करावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
