yuva MAharashtra सांगलीत उद्या 'बाळूमामां'च्या चरित्रावर कीर्तन सोहळा

सांगलीत उद्या 'बाळूमामां'च्या चरित्रावर कीर्तन सोहळा

सांगली टाईम्स
By -


सांगली / प्रतिनिधी 

दर अमावश्या प्रमाणे यावेळीही उद्या शुक्रवार २८ फेब्रुवारी रोजी संजय नगर येथील डी युवा शक्तीच्या संपर्क कार्यालयासमोर सायंकाळी ६. ३० वाजता श्री संत बाळूमामा यांच्या फोटोचे पूजन आणि कीर्तन सोहळा, महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व भक्त, नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन विनायक रुपनर यांनी दिली.

रुपनर म्हणाले, दर अमावश्येला डी युवा शक्तीच्या वतीने श्री संत बाळूमामा यांच्या महाआरती व महाप्रसादाचे आयोजन केले जाते. नागरिकांचा याला मोठा प्रतिसाद मिळत मिळतो.



यावेळी शुक्रवार २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६. ३० वाजता श्री संत बाळूमामा यांच्या फोटोचे पूजन, महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच बाळूमामा यांच्या जीवन चरित्रावर ह. भ. प. संजिवनीताई शिंगाडे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे, याचा सर्व भक्त, नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रुपनर यांनी केले आहे. 

Tags: