◼️जुगाई हायस्कूलचा १०० टक्के निकाल
येळवण जुगाई / एस टी . लष्कर
जुगाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येळवण जुगाई ता शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. यामध्ये विशेष प्राविण्य 17, प्रथम श्रेणी 8 द्वितीय श्रेणी 8 व पास 3 मध्ये यश संपादन केले.
प्रथम क्रमांक -कुमार कस्तुरे वैभव नथुराम- 92% , द्वितीय क्रमांक - कुमारी नारकर शर्वरी गणेश _ 91.60% तृतीय क्रमांक - कुमारी बोडके सारीका विठ्ठल -90.60%चतुर्थ क्रमांक - कु. पाटील वेदांत संदीप -88.80% पाचवा क्रमांक कुमारी बाऊदणे गिता बिरु 86.60% व इयत्ता १२ वी (कला) शाखेचा निकाल 94.28% विद्यालयाची प्रथम क्रमांक कुमारी सानिया रवींद्र चव्हाण -77.67% द्वितीय क्रमांक कुमारी गुरव दीक्षा रामचंद्र -76.67% तृतीय क्रमांक कुमारी शेळके मयुरी रामचंद्र 76.17% चतुर्थ क्रमांक कुमारी सोष्टे, प्रिया कृष्णा 76.17 पाचवा क्रमांक कुमारी वारे प्रज्ञा आनंदा 75.33%
या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर, माजी आमदार सत्यजित पाटील, युवराज पाटील, विद्यालयाचे प्राचार्य ए. जी. कांबळे सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षककेत्तर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती यांचे मार्गदर्शन लाभले.
