◼️मोठ्या संख्येने उपस्थित रहा
◼️जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांचे आवाहन
सांगली । प्रतिनिधी
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्यानेे अतुलनिय पराक्रम केला. त्यांच्या समर्थनार्थ शिवसेनेच्या वतीने सांगली शहरात मंगळवार २० रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना सांगली व मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीत शिवसैनिकांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे, आनंदराव पवार यांनी केले आहे.
जम्मू काश्मिर मधील पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. याचे प्रत्युत्तर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून दिले. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने मोठा पराक्रम गाजवला. पाकिस्तानचे हवाई अड्डे, दहशतवादी अड्डे जमिनोदोस्त केले. काही दहशतवाद्यांना ठार केले. वायु सेना, नौसेना, लष्कराने आपआपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली. पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्याचा प्रत्युत्तर दिले. सैनिकांच्या या पराक्रमाच्या समर्थनार्थ शिवसेनेच्या वतीने संपूर्ण राज्यात तिरंगा रॅली काढण्यात येत आहे.
शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार सांगलीतही मंगळवार दि. २० रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील हिंदूह्दय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे चौकातून या रॅलीस सुरवात होणार असल्याचे सांगत जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे म्हणाले, शिवसेना सांगली व मिरज विधानसभा मतदार संघाच्या वतीने या मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना, युवा सेना, महिला आघाडीसह शिवसेना ओबीसी, व्हीजेएनटी सेना, बांधकाम कामगार सेनेसह सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, शिवसैनिक या रॅलीत सहभागी होणार आहेत. नागरिकांनीही या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन चंडाळे यांनी केले आहे.
