सांगली । प्रतिनिधी
छत्रपती युवराज संभाजीराजे अध्यक्ष असलेल्या स्वराज्य पक्षाच्या मुंबई विभाग युवक आघाडीच्या अध्यक्षपदी संतोष कदम यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे उपाध्यक्ष अंकुशबाबा कदम, सरचिटणीस धनंजय जाधव यांच्या सहीने त्यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या मुंबई येथील कार्यालयात त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. छावा युवक प्रदेश कार्याध्यक्ष पदावर काम करत असताना संपूर्ण महाराष्ट्रात युवक आघाडीचे जाळे उभे केले. राज्यात त्यांचे युवकांचे मोठे संघटन आहे.
पक्षाची ध्ययधोरणे समाजाच्या तळागाळात पोहचण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करु. अधिकाधिक तरुण पक्षाच्या प्रवाहात आणत संघटन मजबूत करु अशी ग्वाही कदम यांनी यावेळी बोलताना दिली. स्वराज्य संघटनेचे सक्रिय कार्यकर्ता म्हणून कदम यांची ओळख आहे. पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो.
त्यांच्या या कामाची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर मुंबई विभाग युवक आघाडीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कदम यांच्याकडे मुंबईतील मुंबई, रायगड, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यातील संघटनात्मक जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
