येळवण जुगाई / एस टी लष्कर
शाहूवाडी तालुक्यातील येळवण जुगाई येथील माजी आमदार श्री बाबासाहेब पाटील शिक्षण संस्थेचे जुगाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज च्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठया उत्साहात आगळ्या वेगळया पद्धतीने विद्यार्थ्याना ग्रंथालयातील वाचनीय पुस्तके देवून दोन तास वाचन नंतर अभिप्राय लिहणे अशा उपक्रमाने साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य अनिल कांबळे होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून गावातील मुख्य रस्त्यावरून प्रभात फेरी काढण्यात आली .विद्यार्थ्याच्या घोषणांनी परिसर दुमदुमला. कार्यक्रमाची प्रस्तावना उत्तम पोवार यांनी केले. विद्यार्थी संस्कृती वरेकर व नंदिनी पाटील ह्या मुलीनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण व जीवन कार्य विषयी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात अनिल कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे सर्वानी पाईक होण्याचे अव्हान केले. कार्यकमाचे सुत्रसंचलन एस टी लष्कर यांनी तर आभार एस ए पाटील यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, शिक्षककेत्तर कर्मचारी, विदयार्थी वसतीगृहाचे अधिक्षक उपस्थित होते.
.jpg)