◼️ पदभार स्वीकारला
◼️अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्यासह अधिकाऱ्यांकडून स्वागत
सांगली / प्रतिनिधी
सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर सत्यम गांधी (आयएएस) यांनी बुधवारी तातडीने हजर होत पदभार स्वीकारला. अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्यासह अधिकाऱ्यांनी मनपा मुख्यालयात त्यांचे स्वागत केले. पदभार स्वीकारताच गांधी यांनी तातडीने विविध विभागात जात कामकाजाची माहिती घेतली.
मंगळवारी सत्यम गांधी यांच्या नियुक्तीबाबतचे आदेश निघाले होते. त्यानंतर तातडीने गांधी आज सकाळी महापालिका मुख्यालयात दाखल झाले. यावेळी प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ आणि अन्य अधिकाऱ्यांनी नूतन आयुक्त गांधी यांचे स्वागत केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करीत सत्यम गांधी यांनी आयुक्त दालनात जाऊन आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला.
यावेळी महापालिकेच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आयुक्त सत्यम गांधी यांचे स्वागत केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त वैभव साबळे, स्मृती पाटील, शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त आकाश डोईफोडे, लेखाधिकारी अभिजित मेंगडे आधी उपस्थित होते. पदभार स्वीकारल्यानंतर नूतन आयुक्त माननीय सत्यम गांधी यांनी विविध विभागात भेटी देऊन कामकाजाची माहिती घेतली.
