◼️ अँड. कृष्णा पाटील
◼️सावळज मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात
तासगाव / प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विश्व कल्याणाचा विचार करून सर्वांना समावेशक संविधान दिले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जयंती व उत्सवापुरते मर्यादित न ठेवता सर्वांनी वर्षभर आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अँड. कृष्णा पाटील यांनी केले.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सावळज येथे मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी ऍड.कृष्णा पाटील होते. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी ताजुद्दिन तांबोळी सागर पाटील ,संजय थोरात, प्रशांत कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.
तालुका कृषि अधिकारी सुजाता कांबळे, आदर्ष शिक्षिका पौर्णिमा धेंडे, प्रिन्सिपॉल वैभव धेंडे रोहिणी पवार, विकास धेंडे, प्रतिष्ठा कांबळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास सरपंच मीनल पाटील, उपसरपंच रमेश कांबळे, राजू भाउ सावंत , कौंग्रस नेते विजय पाटिल, अर्चना धेंडे,मनोज पाटील, राजेश गायकवाड, दीपक उणउने, राहुल कलाल, विश्वास निकम, संतोष कांचांकोटी, व जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन बौद्ध समाज व विश्र्वशंती बौध्द विहार अध्यक्ष महावीर धेंडे यांच्या सह पांडुरंग भिसे, सदाशिव धेंडे, हर्ष झेंडे, सौरभ कांबळे, पवन भिसे, आशुतोष साठे, आशिष साठे, राहुल कांबळे, अक्षय कांबळे, मनीष झेंडे, उमेश झेंडे, मनीष झेंडे, यांनी केले. सूत्रसंचालन राज भिसे यांनी केले, तर स्वागत विजय धेंडे यांनी केले. आभार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले तालुका अध्यक्ष प्रविण धेंडे यांनी मानले.
