yuva MAharashtra संजयनगर मध्ये डॉ. बाबासाहेबांना अभिवादन

संजयनगर मध्ये डॉ. बाबासाहेबांना अभिवादन

सांगली टाईम्स
By -

 


◼️सुजित काटे मित्र परिवारातर्फे आयोजन 

◼️ बांधकाम कामगार, आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी शिबिरास प्रतिसाद

सांगली / प्रतिनिधी

येथील संजयनगर परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील सुजितकुमार काटे मित्र परिवार व भारतीय जनता पक्षातर्फे डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहत बाबासाहेबांना अभिवादन केले. दरम्यान या निमित्ताने बांधकाम कामगार, आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. यास मोठा प्रतिसाद मिळाला.

भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. डॉ. आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त संजयनगर परिसरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण परिसर निळा झाला होता. यावेळी भाजपाचे सुजितकुमार काटे, माजी नगरसेवक शीतल पाटील, युवा नेते अतुल माने, रवींद्र सदामते, भूपाल सरगर, कल्पना काटे, ज्योती माने, रुपाली अडसूळ, अश्विनी तारळेकर, सुशांत काटे, दरीबा बंडगर, श्रीकांत वाघमोडे, शंकर जाधव, तमन्ना वाघमारे, दीपक चौगुले, दिनेश कांबळे, सचिन काटे, अमोल आटपाडे, रमेश खांडेकर, धनंजय हाके, प्रकाश पवार, सुशांत तूपसौंदर्य, निर्भय काटे, अमोल सदाकाले, मिलिंद कांबळे, निलेश साबळे, सोहम धोत्रे, सुशीलकुमार काटे आदी उपस्थित होते.