◼️कोल्हापूर दौऱ्यावर असताना गनिमी काव्याने निषेध
◼️शक्तिपीठ रद्द करण्याची मागणी
◼️संपूर्ण कर्जमाफी करावी मागणी
सांगली / प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन देऊन आता पलटी मारणाऱ्या राज्यातील महायुतीच्या सरकारविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौ-यावर असताना हातकंणगले नजीक काळे झेंडे दाखविण्यात आले. कोल्हापूरहून जयसिंगपूर कडे जात असताना स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने त्यांना काळे झेंडे दाखविले.
स्वाभिमानीच्या या आंदोलनामुळे कर्जमाफी आणि शक्तिपीठ महामार्गाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. राज्यातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. परंतु ते पाळलेले नाही. कर्जमाफी देता येत नसल्याचे सरकारमधील मंत्री बोलत आहेत. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या हजारो एकर बागायती शेतीवर जेसीबी फिरवत सरकारने शक्तिपीठ महामार्गाचा घाट घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
माजी खासदार राजू शेट्टी अध्यक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हा मुद्दा चांगलाच लावून धरला आहे. स्वतः शेट्टी महाराष्ट्रभर फिरून याविरोधात रान उठवत आहेत. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राज्यातील शेतक-यांना संपुर्ण कर्जमाफी व शक्तीपीठ रद्द व्हावा म्हणून राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौ-यावर असताना हातकंणगले नजीक काळे झेंडे दाखविण्यात आले. कोल्हापूरहून जयसिंगपूर कडे जात असताना स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने त्यांना काळे झेंडे दाखविले.
