![]() |
| नूतन अध्यक्ष क्रीडाशिक्षक राहुल जाधव |
तासगाव / प्रतिनिधी
महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि सांगली जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्यावतीने क्रीडाशिक्षक राहुल जाधव यांची तासगाव तालुका टेनिस क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे अशी माहिती सांगली जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव विजय बिराजदार यांनी दिली.
सांगली जिल्ह्यातून टेनिस क्रिकेटमधून चांगल्या दर्जाचे क्रिकेट खेळाडू घडावे, यासाठी महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून सांगली जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन काम पाहते. सांगली जिल्हा टेनिस क्रिकेट हे राष्ट्रीय शालेय टेनिस क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असून सांगली जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील खेळाडूना असोसिएशन अधिकृत जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धामध्ये खेळाडूंना खेळण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यावेळी तासगाव तालुका टेनिस क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. राहुल जाधव हे स्वतः उत्कृष्ट टेनिस, क्रिकेटपटू आहेत. विद्यार्थीना खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी ते प्रयत्न असतात . यावेळी जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष-विक्रमसिंह सावंत, कार्याध्यक्ष-परवेज गडीकर, उपाध्यक्ष अझरुद्दीन शेख, सचिव-विजय बिराजदार, खजिनदार-स्वप्निल सुर्वे व संघटनेचे पदाधिकारी महम्मदहुसेन शेख, यश सावंत, सचिन चव्हाण, धनंजय काटे, नामदेव बेळे उपस्थित होते.
