yuva MAharashtra गॅस दरवाढ विरोधात ठाकरे सेना आक्रमक

गॅस दरवाढ विरोधात ठाकरे सेना आक्रमक

सांगली टाईम्स
By -


◼️सांगलीत रस्त्यांवर चूल मांडत आंदोलन 
◼️ केंद्र, राज्य शासनाचा निषेध

सांगली । प्रतिनिधी

महागाई, गॅस दरवाढीच्या निषेर्धात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला आहे. सांगलीत ठाकरे गटाच्या वतीने येथील स्टेशन चौकामध्ये रस्त्यांवरच चुली पेटवत भाकरी थापत आंदोलन करण्यात आले. केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. देशामध्ये महागाईने उच्चांक गाठला आहे. नागरिकांना लुबाडण्याचे काम सुरु आहे असा आरोप यावेळी सेनेचे उपजिल्हाप्रमुख शंभोराज काटकर यांनी यावेळी बोलताना केला.

केंद्र शासनाने नुकतीच घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 50 रुपयांची वाढ केली. याचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षांकडून या विरोधात राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. सांगलीतही येथील हिंदूह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौकात सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. उपजिल्हाप्रमुख शंभोराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला शिवसैनिकांनी रस्त्यांवरच चुली मांडल्या. त्यांवर स्वयंपाक करत गॅस दरवाढीचा निषेध केला. केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. निषेध करण्यात आला.

यावेळी बोलताना काटकर म्हणाले, सामान्य नागरिकांना लुटण्याचे काम केंद्र व राज्य सरकारकडून सुुुरु आहे. इंधनाचे दर वाढत आहेत. जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या आहेत. त्यातच आता 50 रुपयांनी गॅस दरवाढ करण्यात आली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या या नाकर्तेपणामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. शासनाने सर्वसामान्यांच्या भावना लक्षात घेत महागाईतून मुक्त करावे, अन्यथा यापुढच्या काळात यापेक्षाही मोठे आंदोलन करु. पंडितराव बोराडे, विेराज बुटाले, रुपेश मोकाशी, राम काळे, प्रसाद रिसवडे, संतोष पाटील, गणेश लोखंडे, अनिल शेटे, सुजाताताई इंगळे, हेमा कदम, तमन्ना सतारमेकर, दीपा इंगळे, शाकिरा जमादार, माधुरी चव्हाण, जहाँआरा मुल्ला, नीता आवटी, महादेवी कोकुटनूर, बिस्मिल्ला शेख, शैलजा पाटील, विजया सुतार आदी उपस्थित होते. 

Tags: