तासगाव / प्रतिनिधी
मणेराजुरी ता.तासगाव येथे महाराष्ट्र शासनाचे वतीने कार्यालयीन कामकाज गतीमान अभियान अंतर्गत महसूल विभाग यांच्या वतीने कृती आराखडा शिबीर संपन्न झाले.या शिबीरामध्ये विविध प्रकारच्या लाभार्थींनी लाभ घेतला.
प्राताधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते लाभार्थी यांना दाखले, ७/१२, वाटप पाणंद रस्ता नोंद, लक्ष्मी मुक्तीचे लाभार्थी यांना लाभ देण्यात आला. यावेळी तहसीलदार राजेंद्र पाटोळे,सतीश पवार, सरपंच सारीका जमदाडे, शशिकांत जमदाडे,बाळु तात्या पवार, मणेराजुरी मंडल क्षेत्रातील तलाठी, गव्हाण, योगेवाडी, उपळावी, धुळगाव, कौलगे, सावर्डे, डोर्ली, येथील लाभार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मंडल अधिकारी राजेश्री सानप यांनी केले तर गाव कामगार तलाठी प्रकाश पांढरे यांनी आभार मानले.
