⚫ मक्तेदार संघटनेकडून आयुक्तांसह कर्मचार्यांचा सत्कार
सांगली / प्रतिनिधी
चालू आर्थिक वर्षामध्ये सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका प्रशासनाने मक्तेदारांची जनरल फंडातील तब्बल 85 कोटी रुपयांची बिले अदा केली आहेत. त्यामुळे मक्तेदारांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका मक्तेदार असोशिएशनच्या वतीने मंगळवारी प्रभारी आयुक्त रविकांत आडसूळ, मुख्यलेखाधिकारी अभिजीत मेंगडे, शहर अभियंता पृथवीराज चव्हाण, लिपीक मठद, मोहन कांबळे यांच्यासह अन्य कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मक्तेदार असोशिएशनचे अध्यक्ष सुजीतकुमार काटे, संघटक साजिदभाई शेख, संस्थापक अध्यक्ष सज्जन पाटील, रौफ भालदार, कय्युम नदाफ, अजिंक्य जाधव, प्रकाश नवलाई, आकाश भोसले, म्युजीमल अत्तार, श्रीकांत साठे, शिवाजी जाधव, आशिष पवार, नयुम नदाफ, मुकूंद काळे, जावेद शेख आदी मक्तेदार उपस्थित होते.
