⚫ सुरेश चव्हाणके यांचे आवाहन
⚫ देशात १० कोटी घुसखोर
⚫ सरकारवर दबाव आणा
⚫ सांगलीत तीन लाखांवर संख्या
सांगली । प्रतिनिधी
अखंड हिंदुस्थानमध्ये बांगलादेश, पाकिस्तान, अफगानिस्तान, म्यानमारसह अन्य देशांतून आलेल्या घुसखोरांची संख्या १० कोटीं इतकी आहे. केवळ सांगली जिल्ह्यातील संख्या पावने तीन ते तीन लाखापर्यंत आहे. केवळ भाषणबाजी करुन आमदार, खासदार निवडून, सरकार आणून घुरखोरांना आपल्या देशातून पळविणे शक्य नाही. त्यासाठी एनआरसीसह मुस्लिम जनसंख्या नियंत्रण कायदा आणावा लागेल, त्यासाठी केंद्र शासनावर दबाव आणा. हे कायदे कधी येणार याची विचारणा करा, अन्यथा २०४७ मध्ये हिंदू अल्पसंख्याक होईल अशी भिती सुदर्शन चॅनेलचे संपादक सुरेश चव्हाणके यांनी आज येथे बोलताना व्यक्त केली.
येथील मारुती चौकामध्ये हिंदू एकता आंदोलनाच्यावतीने आयोजित गुढीपाडवा मेळाव्यात ‘घुसखोर मुक्त महाराष्ट्र अभियान’ या विषयांवर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार तथा हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे, युवा नेते पृथवीराज पवार, मकरंद देशपांडे, अॅड. स्वातीताई शिंदे, विक्रम पावसकर, विनायक पावसकर, हिंदूराव शेळके, हिंदू एकता आंदोलनाचे सर्व जिल्हाध्यक्ष, पदाधिकार्यांसह असंख्य हिंदूत्ववादी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. पुढे बोलताना सुरेश चव्हाणके म्हणाले, घुसखोरांचा गंभीर प्रश्न देशांसमोर आ वासून उभा ठाकला आहे. देशात सद्या १० कोटी घुसखोर आहेत. मुंबईत ४० लाख तर सांगली सारख्या जिल्ह्यात ही संख्या ३ लाखापर्यंत आहे. सांगलीकरांनी या घुसखोरांची शोध मोहिम राबवावी.
त्यांची नावे मतदान यादीतून वगळण्यासाठी प्रयत्न करावेत. सांगलीत टिपू सुलतानची जयंती साजरी होते. तो मानवतेचा दुश्मन होता. त्याने सर्वात जास्त लढाया मराठ्यांशी केल्या. तो टिप सुलतान नव्हे तर सैतान, त्याचे समर्थन करणारा राज्याचा गद्दार असेल. नागपूर मध्ये काहींनी हैदोस घातला. पोलिसच जीव वाचविण्यासाठी पळत होते. कारण पोलिसांपेक्षा हैदोस घालणार्यांची संख्या अधिक आहे. सांगलीला नागपूर, मालेगाव, भिवंडी सारखे होऊ द्यायचे नसेल तर हिंदूनी एकत्र आले पाहिजे. जन्माल येणारी १०० पैकी ६७ मुले ही मस्लिमांची असतात. पण दोन हिंदू मिळून दोन मुलांना जन्माला घालू शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. यासाठी मुस्लिम लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याची आवश्यकता आहे. अन्यथा २०४७ मध्ये या देशात हिंदूच अल्पसंख्याक होतील.
बांगलादेशमध्ये असंख्य हिंदूवर अत्याचार झाले. महिला, मुलींवर बलात्कार झाले. हिंदूची मंदीरे तोडण्यात आली. पण मुंबईत मतांसाठी लाचार झालेले काही नेते घुसखोरांना आश्रय देतात. मालेगावमध्ये तेथील आमदाराने ३५ हजार जणांना आधारकार्डसाठी पत्रे दिली. औरगांबादच्या एमआयएमच्या खासदाराने १७ हजार ५०० घुसखोरांना पत्रे दिली. भारतीची भूमी त्यांना खिरापतीसाठी वाटली जात आहे. या घुसखोरांना देशातून हुसकावून लावले पाहिजे. यासाठी एनआरसी कायद्याची गरज आहे. त्यामुळे शासनावर दबाव आणा, एनआरसी कायदा कधी येणार म्हणून जाब विचारा असे आवाहन करत सुरेश चव्हाणके म्हणाले, हिंदू सद्या आयसीयू मध्ये आहे. त्यामुळे घुसखोरांना शोधण्याची माहिम सुुर करा. अन्यथा पुढील दहा वर्षामध्ये हिंदूचे रक्षण करण्यासाठी कोणी सापडणार नाही.
पडळकर हक्काचे आमदारमाजी आमदार नितीन शिंदे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. सांगली शहरासह जिल्ह्यामध्ये जेंव्हा जेंव्हा काही प्रश्न निर्माण होतात, त्या त्या वेळी आमदार पडळकर यांचे सहकार्य मिळते. ते हक्काचे आमदार आहेत. हिंदुत्वावासाठी आम्ही रस्त्यावरची लढाई लढूच. पण आमदार पडळकरही सभागृहात या विषयांवर आक्रमक मत मांडतात असे कौतुकास्पद उद्गार काढले.
माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले, देशाला घुसखोरांपासून मोठा धोका आहे. प्रतापगडावरील अपजलखानाचे थडगे उखडण्यात आले. पण औरंगजेबाच्या कबरीबाबत निर्णय घेतला जात नाही. प्रत्येक जण म्हणतोय कबर काढली पाहिजे, मग कुठे अडकले आहे? सरकारने औरंगजेबाची कबर काढावी. त्यावर चादर, पुले चढविण्यास बंदी घालावी. हिंदू एकता आंदोलन आक्रमक कार्यकर्त्यांचे नेतृत्व करते. घुसखोरांचा धोका ओळखत हिंदूनी एकत्र आले पाहिजे. आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, आजच्या पाडव्याच्या शुभ दिनी चघुसखोर मुक्त महाराष्ट्र करण्यासाठीचा संकल्प करूया. घुसखोरांना आळा घालणे ही शासन, प्रशासन इतकीच नागरिकांची ही जबाबदारी आहे. एखाद्या हॉटेल वर राहण्यासाठी ओळखपत्र द्यावे लागते, पण देशात असे काही दलाल आहेत, ते हजार, पाचशे रुपयांसाठी घुसखोरांना आधार कार्ड बनवून देतात.
सांगलीतील घुसखोरांची संख्या चिंताजनक आहे. पोलिसांनी जिल्हाभरामध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवावे. घुसखोरांची तपासणी करावी. या देशामध्ये केवळ सच्चे देशभक्तच राहिले पाहिजेत. पाकिस्तान जिंंकला की सांगली, मिरजेत घोषणा दिल्या जातात. यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही. तालिबान, हमास, इसीस प्रमाणे या देशातील काँग्रेसही याच विचारांची आहे. मतांच्या लाचारीसाठी घुसखोरांना सरंक्षण दिले जाते. मतांच्या राजकारणासाठी रोज नवे इतिहास संशोधक जन्माला येत आहेत. जेव्हा देशाचा आणि धर्माचा विषय असेल त्यावेळी आम्ही एक असू. सोबत असू. जागे व्हा. जागरूकपणे पुढे जाण्याची गरज आहे. धर्मांतराचा प्रश्न आ वासून पुढे आहे. रेशन साठी धर्मांतर करणार्यींनी ओलादिनो धर्मवीर संभाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा असे आवाहन त्यांनी केले. अॅड. स्वाती शिंदे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन विजय कडणे यांनी तर स्वागत अरुण वाघमोडे, संजय जाधव यांनी केले.
