◼️इदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण
◼️लोकप्रतिनिधी, प्रशासकिय अधिकार्यांकडून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा
सांगली । प्रतिनिधी
सांगली शहरांमध्ये सोमवारी मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली. येथील जुना बुधगाव रोडवरील इदगाह मैदानावर समस्त मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सकाळी साडे आठ वाजता सामूहिक नमाज पठण केले. ‘ईद मुबारक’ म्हणत एकमेकांना अलींगन देत शुभेच्छा दिल्या. भाईचारा व एकोपा जपण्याचा संदेश देण्यात आला. यावेळी मुस्मिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व पक्षीय राजकिय नेते, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधीसह प्रशासकिय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
येथील इदगाह मैदानावर सकाळपासूनच हजोरो मुस्लिम बांधवांनी गर्दी केली होती. सकाळी साडे आठ वाजता नमाज पठण करण्यात आले. मुफ्ती मुजाहिद कंवर मशिदीच्या इमामांनी नमान पठण केले, तर खुदबा पठण मुफ्ती मोहसीन चांदतारा मशिदीच्या इमामांनी केले. यानंतर संदेश वाचन करण्यात आले. भाईचारा, एकोप्याचा संदेश देण्यात आला. यावेळी मुस्लिम बांधवांनी एकमेकांना अलींगन देत शुभेच्छा दिल्या. ‘ईद मुबारक’ म्हणत एकमेकांशी हस्तांदोलन केले. यावेळी मुस्लिम बांधवांच्या चेहर्यावर अमाप उत्हास दिसून येत होता. इदगार समितीच्या वतीने नमाज पठणाची उत्कृष्ठ सोय करण्यात आली होती.
![]() |
| ADVT. |
दरम्यान मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत नागरिक, प्रशासकिय अधिकारी उपस्थित होते. यामध्ये खासदार विशाल पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, माजी महापौर दिग्वीजय सूर्यवंशी, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते संजय मेंढे, जयहिंद पक्षाचे प्रमुख चंदनदादा चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, जनसुराज्य पक्षाचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे, माजी नगरसेवक राजेश नाईक, माजी नगरसेवक फिरोज पठाण, सामाजिक कार्यकर्ते असीफ बावा, लालू मेस्त्री, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक रितू खोकर, सांगली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे, सांगली वाहतूक शाखेचे निरीक्षक मकरंद कुलकर्णी, दि मुस्लिम जमियत ईदगाह कमिटीचे अध्यक्ष माजी नगरसेवक मुन्ना कुरणे, कय्युम पटवेगार, मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे हाफिज सद्दाम सय्यद, सुफीयान पठाण आदी उपस्थित होते.

