yuva MAharashtra मणेराजुरीतील श्री लक्ष्य स्कूल ला ' आय एस ओ ' मानांकन

मणेराजुरीतील श्री लक्ष्य स्कूल ला ' आय एस ओ ' मानांकन

सांगली टाईम्स
By -


तासगाव / प्रतिनिधी 

मणेराजुरी ( ता, तासगाव ) येथील श्री लक्ष्य निवासी सैनिक पॅटर्न स्कूल व ज्यु कॉलेज ला आय एस ओ मानांकन सर्टिफिकेट प्राप्त झाले. सांगलीचे नवनिर्वाचित खासदार  विशाल पाटील यांचे हस्ते संस्थापक विशाल माळी यांना आयएसओ मानांकन सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले. अल्पावधीत आपल्या गुणवत्तेच्या जोरावर हा सन्मान प्राप्त करणारी पहिली शाळा असल्याचे खासदार विशाल दादा यांनी मत व्यक्त केले. 

यावेळी श्री लक्ष्य स्कूल सचिव मुख्याध्यापिका रुपाली लांडगे,  संजय कुलकर्णी, प्रा. ए बी जमदाडे, उपमुख्याध्यापक विश्वनाथ गुरव, क्रीडा शिक्षक सौरभ पाटील उपस्थित होते. आय एस ओ मानांकन प्राप्त झाले बद्दल श्री लक्ष्य परिवारामधे आनंदाचे वातावरण पसरले आहे. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय  स्तरातून शाळेवरती शुभेच्छांचा वर्षाव  होत आहे.

Tags: