yuva MAharashtra संजयकाका राष्ट्रवादीचे; पुनर्वसनाची जबाबदारी अजितदादांची..!

संजयकाका राष्ट्रवादीचे; पुनर्वसनाची जबाबदारी अजितदादांची..!

सांगली टाईम्स
By -



◼️पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

◼️संजयकाकांच्या अडचणी वाढल्या

सांगली / प्रतिनिधी

भाजपचे माजी खासदार आणि आता अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले संजयकाका पाटील यांची अवस्था आता ना घर का ना घाट का अशी झाली आहे. संजयकाका राष्ट्रवादीचे आहेत, त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी अजितदादांची असल्याचे सांगत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी संजयकांच्या भाजप प्रवेशाला कोलदांडा घातला. यामुळे संजय पाटील यांच्या समोरील राजकीय अडचणी वाढल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर संजय पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तासगाव - कवठेमंकाळ विधानसभा मतदार संघातून नशीब आजमावले. परंतु तिथेही त्यांना अपयश आले. त्यानंतर त्यांनी पुन्हा राजकीय ट्रॅक बदलत भाजप प्रवेशासाठी धडपड सुरू केली आहे. परंतु भाजपकडून त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी खासदार संजय पाटील यांची निवासस्थानी जात भेट घेतली होती. मात्र पाटील यांची वाट पाहत मंत्री पाटील यांना ताटकळत बसावे लागले होते. 

दरम्यान माजी खासदार पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत विचारले असता मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, संजय पाटील आमचे जुने सहकारी आहेत. परंतु सद्या ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. त्यांचे राजकीय पुनर्वसन करणे हे अजितदादांचे काम आहे. त्यासाठी त्यांना सहकार्य करू, असे म्हणत संजय पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या धडपडीवर पाणी ओतले आहे. प्रवेशाला कोलदांडा घातला आहे. दरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे संजय काका पाटील यांच्यासमोर राजकीय अडचणीमध्ये मोठी वाढ झाली आहे.

Tags: