◼️शिवसेनेचे सांगली विधानसभा प्रमुख नानासाहेब शिंदेंचा उपक्रम
सांगली / प्रतिनिधी
पुढारीपण मिरवण्यासाठी नव्हे तर ते जनतेच्या सेवेसाठी असते. जनतेची विकासकामे, त्यांना दिलासा देण्यासाठी असते. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शिवसेनेचे सांगली विधानसभा क्षेत्र प्रमुख नानासाहेब शिंदे. शिंदे यांनी स्वखर्चातून शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील गुलाब कॉलनी येथे वडाच्या झाडाभोवती दगडी कट्टा बांधत सामाजिक बांधिलकी जपली. परिसरातील नागरिकांकडून त्यांच्या या कामाचे कौतुक होत आहे.
नानासाहेब शिंदे यांचा शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक काम, उपक्रमांमध्ये सातत्याने पुढाकार असतो. प्रभागातील नागरिकांच्या हाकेला त्वरित धावणारा कार्यकर्ता म्हणून शिंदे यांची ओळख आहे. आरोग्याचे काम असो वा प्रभागातील ड्रेनेजचे. समस्या असणाऱ्या ठिकाणी जात ती पूर्णपणे सोडविण्यात शिंदे यांचा हातखंडा आहे. सकाळी ६ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी त्याचीं सातत्याने धडपड सुरू असते.
प्रभाग १७ मधील गुलाब कॉलनी मध्ये वडाचे झाड आहे. त्याभोवती कट्टा बांधण्याची परिसरातील नागरिकांची विशेषतः महिलांची अनेक वर्षापासून मागणी होती. वटसावित्री पौर्णिमेला वडाच्या झाडाला पुजण्यासाठी परिसरातील हजारो महिला येत असतात. या मागणीची दखल घेत शिंदे यांनी स्वखर्चाने या झाडाभोवती भक्कम असा दगडी कट्टा बांधून घेतला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिंदे यांच्या कामाचे कौतुक होत आहे.
