yuva MAharashtra विशाल माळी यांची महाराष्ट्र थाय बॉक्सिंग असो. च्या कार्याध्यक्ष पदी निवड

विशाल माळी यांची महाराष्ट्र थाय बॉक्सिंग असो. च्या कार्याध्यक्ष पदी निवड

सांगली टाईम्स
By -

तासगाव  /  प्रतिनिधी

शिर्डी ( अहिल्यानगर )  येथे  महाराष्ट्र थाय बॉक्सिंग असो. च्या झालेल्या निवडणूकित राष्ट्रीय थाय बॉक्सिंग महासंघाचे अध्यक्ष पी. वाय. आत्तार व संतोष खैरनार यांच्या उपस्थितीत मणेराजुरी येथील श्री लक्ष्य स्कूल चे संस्थापक अध्यक्ष विशाल माळी  यांची थाय बॉक्सिंग महाराष्ट्र राज्य असोसिएशनच्या कार्याध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली. 

महाराष्ट्र थाय बॉक्सिंग कार्यकारणी अशी 

कार्याध्यक्ष विशाल माळी सर (सांगली), सचिव अजय खेडगरकर (नागपूर), खजिनदार गणेश मांढरे ( पिंपरी चिंचवड), संघटक महाराष्ट्र रविराज गाढवे सातारा, टेक्निकल डायरेक्टर वजीर शेख, वरिष्ठ उपाध्यक्ष सलीम शेख, सहसचिव कारभारी गायकवाड. निवड झालेल्या  सर्व पदाधिकारी यांचे राज्य संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

ही निवड सांगली जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट असून  सर्वच स्तरातून त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ही निवड माझ्यासाठी खूप मोठी जबाबदारी असून अतीशय प्रामाणिक पणे व पदाला शोभेल असे कार्य करेन असे मत थाय बॉक्सिंग नूतन कार्याध्यक्ष माळी सर यांनी व्यक्त केले. 

यावेळी प्रियंका अचमट्टी (पिंपरी चिंचवड) अरुणा हीवरकर ठाणे शुभांगी सहारे (नागपूर) यांची राष्ट्रीय  थाय बॉक्सिंग संघटने मधे निवड करण्यात आली. 


Tags: