yuva MAharashtra विठाबाई नारायणगावकर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करा

विठाबाई नारायणगावकर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करा

सांगली टाईम्स
By -

 



राष्ट्रवादी सांस्कृतिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांची मागणी.

अहिल्यानगर / प्रतिनिधी 
राज्यातील लोक कलावंतांसाठी स्वर्गीय विठाबाई नारायणगावकर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्र्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये तमाशा, लावणी, संगीत बारी, वासुदेव, पिंगळा जोशी, जागरण, गोंधळ, बहुरूपी, रायरंद, स्मशानजोगी, नंदीवाले, शाहिरी, कलगीतुरा अशा अनेक पारंपारिक लोककला आहेत. बहुतांश लोक कलावंतांची उपजीविका ही त्यांच्या पारंपारिक लोककलेवरच अवलंबून आहे. मात्र अलीकडच्या काळातील सोशल मीडियाच्या प्रचार प्रसारामुळे ग्रामीण भागातील पारंपारिक लोककलावंतांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यांना दररोज आपली कला सादर करण्याची संधी मिळत नाही. संधी मिळाली तर उपजिविके पुरते पैसे मिळत नाही. अनेकदा त्याला व त्याच्या कुटुंबाला अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या सुविधा देखील मिळत नाही. 
याबाबत तमाशा फड मालक तथा विठाबाई नारायणगावकर यांच्या कन्या मंगला बनसोडे म्हणाल्या की, लोककलावंतांच्या दृष्टीने ही अतिशय महत्त्वाची आणि योग्य अशी मागणी आहे. ही मागणी लवकरात लवकर मंजूर झाली पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्रातील लोककलावंतांना चांगला दिलासा मिळू शकतो. तर बाबासाहेब पाटील म्हणाले की, सदर योजनेची नुसती घोषणा नको तर या योजनेसाठी किमान १०० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद येत्या अर्थसंकल्पात करावी व या योजनेची त्वरित अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनास द्यावेत.
त्यामुळे तो अडचणीत सापडतो. अशा वेळी त्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी व हक्काचा आधार देण्यासाठी विठाबाई नारायणगावकर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी. यापूर्वी शासनाने समाजातील सर्वच समाज घटकांची मागणी लक्षात घेऊन अनेक महामंडळांची घोषणा केली व काही आर्थिक विकास महामंडळासाठी आर्थिक तरतूद देखील करण्यात आली आहे. मात्र येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये उर्वरित सर्व महामंडळांसाठी भरीव आर्थिक तरतूद करावी. त्याचबरोबर विठाबाई नारायणगावकर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून त्या महामंडळासाठी किमान शंभर कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. 


Tags: