![]() |
| उपळावी येथे मातंग समाजाच्या स्मशानभूमीच्या संरक्षण भिंतीच्या कामाचे भूमिपूजन करताना सरपंच सौ. आशाताई कदम. |
◼️सरपंच आशाताई कदम यांची ग्वाही
◼️स्मशानभूमीच्या संरक्षण भिंतीच्या कामास सुरवात
तासगाव/ राजाराम गुरव
गावातील दलित समाजाच्या वस्त्यांमधील विकासकामांसाठी माजी खासदार संजय काका पाटील यांच्या माध्यमातून जास्तीस्त जास्त निधी उपलब्ध करू. संपूर्ण दलित वस्त्यांच्या कायापालट करू, अशी ग्वाही उपळावी गावच्या सरपंच सौ. आशाताई कदम यांनी दिली. येथील मातंग समाजाच्या स्मशानभूमीच्या संरक्षण भिंतीच्या कामाचे भूमिपूजन सरपंच सौ.कदम यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी त्या बोलत होत्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, दलित वस्त्यांमधील प्रलंबित कामांना आता सुरवात झाली आहे. तत्कालीन खासदर संजयकाका पाटील यांच्या विकास निधीमधून मातंग समाजाच्या स्मशानभूमी साठी संरक्षण भिंतीसाठी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर होता. या निधीमधून आता प्रत्यक्ष कामास सुरवात झाली आहे.
उर्वरित कामे ही करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यावेळी उपळावीचे माजी सरपंच चंद्रकांत कदम (सर), बाळूभाऊ शिंदे, सज्जन शिरतोडे, माजी उपसरपंच संजय पवार, महादेव पवार, ग्रामपंचायत सदस्य पोपट शेठ, नंदू रोकडे, विनायक आवळे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक समिती अध्यक्ष रवींद्र आवळे, डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हाध्यक्ष प्रशांत आवळे, दिलीप आवळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.jpg)