◼️ माजी आमदार नितीन शिंदे
◼️ हिंदू एकता आंदोलनाचे जोडे मारो आंदोलन
सांगली / प्रतिनिधी
राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी याने औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, त्याने भारताच्या सीमा वाढवल्या औरंगजेब क्रूर नव्हता अशा पद्धतीने वक्तव्य करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अपमान केलेल्याच्या निषेधार्थ आज हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने अबू आझमीच्या व औरंगजेबाच्या प्रतिमेला जोडे मारून प्रतिमाचे दहन करण्यात आले.
यावेळी बोलताना हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की, आमदार अबू आझमी याने यापूर्वी विधानमंडळात मी वंदे मातरम म्हणणार नाही, मी भारत माता की जय म्हणणार नाही असे वक्तव्य केलेली आहेत आणि आता क्रूरकर्मा औरंगजेबाचे आता उदो उदो केले आहे. अशा या देशद्रोही वृत्तीच्या अबू आझमी याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याची आमदारकी राज्यातल्या हिंदुत्ववादी सरकारने रद्द करावी अन्यथा या अबू आझमीला राज्यात शिवभक्त फिरू देणार नाहीत. औरंगजेब हा हिंदुद्वेष्टा, हिंदूंचे मंदिरे तोडणारा, हिंदूंचे धर्मांतरण करणारा, हिंदूंच्या महिलांच्यावर अत्याचार करायला सांगणारा हा क्रूरकर्मा होता. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना इस्लाम धर्म स्वीकार करण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे अनन्वित अत्याचार करून हत्या केली अशा क्रूरकर्मा औरंगजेबाचे उदो उदो करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अपमान अबू आझमीने केला आहे. त्याला शिवभक्त कदापी माफ करणार नाहीत.
यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष संजय जाधव, भाजपाचे नेते अविनाश मोहिते, प्रसाद रिसवडे आदींची भाषणे झाली. यावेळी अबू आझमीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून औरंगजेबाच्या प्रतिमेला जोडे मारून व प्रतिमेचे दहन करून निदर्शने करण्यात आली. यावेळी अनिरुद्ध कुंभार, मनोज साळुंखे, अवधूत जाधव, गजानन मोरे, रवींद्र वादवणे, पंडितराव बोराडे, प्रदीप निकम, अरुण वाघमोडे, बाळासाहेब मोहिते, संजय निकम, तानाजी शिंदे, दिग्विजय शिंदे, तुषार कोडग, विनायक ठोंबरे, सुभाष ढमाळ, गोपाळराव माने, नारायण हांडे आदींसह हिंदू एकता आंदोलनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवभक्त उपस्थित होते.
