◼️ भारत विरुध्द इराणच्या मल्लांमध्ये लढती
◼️ प्रथम क्रमांकाच्या कुस्तीस ३ लाखाचे बक्षीस
◼️ प्रथम क्रमांकाच्या कुस्तीस ३ लाखाचे बक्षीस
सांगली । प्रतिनिधी
युगपुरुष श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्त येथील ट्रबल शुटींग सोशल वेलफेअर फौंडेशनच्या वतीने रविवार दि. 9 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता येथील सरकारी घाट जवळील मैदानावर कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले आहे. ‘भारत विरुध्द इराण’च्या मल्लांमध्ये लढती होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुध्द जागतिक विजेता अहमद इराण, रविराज चव्हाण विरुध्द जॉन्टी गुज्जर, मिर्झा इराणा विरुध्द मोनु दहिया व मध्यप्रदेश केसरी सुदेश ठाकूर विरुध्द तुषार डुबे यांच्या लढतींचा समावेश आहे. यासह अन्य छोट्या-मोठ्या शंभरहून अधिक लढती या मैदानावर होणार आहेत.
ट्रबल शुटींग सोशल वेलफेअर फौंडेशनच्यावतीने दरवर्षी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंंतीनिमीत्त दरवर्षी कुस्ती मैदानाचे आयोजन केले जाते. यंदाचे हे तिसरे वर्ष आहे. रविवारी सायंकाळी 4 वाजता हिज हायनेस श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन, आमदार सुधीर गाडगीळ, भाजपाचे प्रदेशउपाध्यक्ष शेखर इनामदार यांच्यासह प्रमुखांच्या उपस्थितीत कुस्त्यांना सुरवात होईल. डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुध्द अहमद इराण यांच्यामध्ये प्रथम क्रमांकाची कुस्ती आहे. यातील विजेत्यास 3 लाख रुपयांचे बक्षिस ठेवण्यात आले आहे. मिर्झा इराण व मोनु दहिया यांची कुस्तीही 3 लाख रुपयांची आहे.
याशिवाय रविराज चव्हाण विरुध्द मॉन्टी गुज्जर यांच्यामध्ये दीड लाख तर सुदेश ठाकूर व तुषार डुबे यांच्यामधील विजेत्यास 1 लाख रुपयांचे बक्षिस ठेवण्यात आले आहे. ेयासह छोट्या-मोठ्या 100हून अधिक कुस्त्या या मैदानामध्ये होणार आहेत. लहान मुलांच्याही कुस्त्या आयोजित करण्यात आल्या आहेत. हिंदकेसरी पै. दिनानाथ सिंह, हिंदकेसरी संतोष वेताळ, हिंदकेसरी विकास जाधव, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, कुस्ती सम्राट आस्लम काझी, आतंरराष्ट्रीय कुस्ती कोच उत्तमराव पाटील, कोल्हापूर महापौर केसरी अमृत भोसले, कुलदीप यादव यांच्यासह कुस्तीतील दिग्गज यावेळी उपस्थित राहणार आहेत.
