सांगली / प्रतिनिधी
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांची अखेर बदली करण्यात आली. त्यांची विदर्भ वैज्ञानिक विकास महामंडळाच्या सदस्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. वाढीव घरपट्टी वरून आयुक्त गुप्ता यांनी सांगलीकरांचा रोष ओढवून घेतला होता. त्याच्याबाबत अनेक तक्रारी होत्या. परिणामी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची बदली करण्यात आली.
आयुक्त गुप्ता यांनी सांगली महापालिकेत पदभार स्वकारल्यापासून प्रशासकीय कारभार पूर्णपणे ढेपाळला होता. प्रशासनावर टक्केवारीसह निविदा मॅनेजचे आरोप झाले. वाढीव घरपट्टीचा मुद्दा त्यांनी रेटण्याचा प्रयत्न केला. सांगलीकरांच्या भावनांचा अनादर करत मनमानी कारभार सुरू होता. त्यांच्याबाबत प्रशासनात ही मोठी नाराजी होती. मंगळवारी त्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले.
