◼️जिल्हाप्रमुख विक्रम (दादा) चव्हाण
◼️सांगली शहराध्यक्षपदी विनयकुमार कोळी यांची निवड
सांगली / प्रतिनिधी
शिवसेना ओबीसी, व्हीजेएनटी सेनेच्या सांगली शहराध्यक्षपदी येथील सामाजिक कार्यकर्ते विनयकुमार कोळी यांची निवड करण्यात आली. जिल्हाप्रमुख विक्रम (दादा) चव्हाण यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी जेष्ठ नेते अरुण खरमाटे, प्रदीपकाका मानेपाटील, विशाल शिंदे, दत्तात्रय चवदार यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केल्याबद्दल त्यांचा शिवसेना सांगली विधानसभा क्षेत्र प्रमुख नानासाहेब शिंदे यांनी सत्कार केला. यावेळी अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने, मुख्य सचिव श्री. संजयजी मोरे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे यांच्या कणखर मार्गदर्शनाखाली राज्यात शिवसेना ओबीसी, व्हीजेएनटी सेनेची तुफान घौडदौड सुरू आहे. सांगली जिल्ह्यातही पक्ष संघटनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शनिवार पासून सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी निवडी करण्यास सुरुवात करण्यात आली. सांगली शहर प्रमुखपदी विनयकुमार कोळी यांची निवड करण्यात आली. जिल्हाप्रमुख विक्रम (दादा) चव्हाण यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
शिवसेना पक्षाची ध्येय, धोरणे, ओबीसी, भटक्या विमुक्तांचे प्रश्न, समस्या सोडविणे, त्यांना राजकीय, सामाजिक प्रवाहात आणून त्यांचे जीवनमान उंचावणे, त्यांच्या आर्थिक, शैक्षणिक, व्यावसायिक, राजकीय उंची वाढविणे यासह अन्य सामाजिक कामे करण्यास ओबीसी, व्हीजेएनटी सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सतत प्रयत्नशील रहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख चव्हाण यांनी यावेळी बोलताना केले.
.jpg)
.jpg)