एक महिन्यात किमया; वाचकांचे मनःपूर्वक आभार
सांगली / प्रतिनिधी
मुद्देसूद, वस्तुस्थितीजन्य, निर्भिड बातमी, सर्वसामान्य जनतेचे मांडलेले प्रश्न, उपेक्षितांना बातमीतून मिळणारा न्याय यामुळे अवघ्या एक महिन्याच्या काळात 'सांगली TIMES' न्यूज पोर्टलने वाचकांच्या मनात घर केले आहे. अवघ्या एक महिन्यात पोर्टलला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. तब्बल एक लाख वाचकांचा टप्पा पूर्ण झाला. तोही केवळ एक महिन्यात. 'सांगली TIMES' ची सुरू असलेली ही वाटचाल कौतुकास्पद असल्याचे मत वाचक व्यक्त करत आहेत.
सांगली नगरीचे आराध्य दैवत श्री गणपतीचे आशीर्वाद, आमचे गुरू आदरणीय अभिजित पांढरे यांचे मार्गदर्शन, आई, वडील, पत्नीसह कुटुंबाचा भक्कम आधारा, मित्रमंडळी, हितचिंतक यांच्या जोरावर १ जानेवरी रोजी सांगली TIMES ची मुहूर्तमेढ रोवली गेली. काळ संघर्षाचा होता. पत्रकारितेतील काही जातीयवादी, गारधी प्रवृत्तीच्या किड्यांनी याला खोडा घालण्याचा प्रयत्न केला. पण वाचकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे सांगली TIMES ने यशस्वीपणे वाटचाल सुरू ठेवली आहे.
३१ जनेवारी रोजी पोर्टल सुरू करून महिना पूर्ण झाला. या कालावधीत अचूक बातम्या देण्याचा प्रयत्न केला. वस्तुस्थिती वाचकांच्या समोर मांडली. यामुळे केवळ महाराष्ट्र, भारत नव्हे तर सातासमुद्रापार पोर्टल पोहचले. आज भारतासह जवळपास १५० देशामध्ये वाचक निर्माण झाला आहे. याचा सार्थ अभिमान 'सांगली TIMES' ला आहे. भविष्यकाळात हे पोर्टल आणखी गतिमान करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता जवळपास १ लाख १५०० वाचकांचा टप्पा पोर्टलने पार केला आहे.

