![]() |
| युवराज छत्रपती संभाजीराजे |
विजेत्या संघास ५० हजार रुपयांचे बक्षीस
मुंबई / प्रतिनिधी
करवीर युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सह्याद्रीनगर, चारकोप, कांदिवली, पश्चिम मुंबई येथे येत्या १५ व १६ फेब्रुवारी अखेर या स्पर्धा होणार आहेत. विजेत्या संघास रोख ५० हजार तर उपविजेत्यास २५ हजार रुपयांचे बक्षीस, सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन महाराष्ट्र स्वराज्य पक्ष युवक आघाडी मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
युवराज छत्रपती संभाजीराजे यांचा वाढदिवस महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीने उपक्रमांनी साजरा केला जातो. सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा, आरोग्य विषयक उपक्रम राबविण्यात येतात. या अनुषंगाने या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्ष सरचिटणीस धनंजय भाऊ जाधव व महाराष्ट्र स्वराज्य पक्ष उपाध्यक्ष अंकुश कदम बाबा व विविध सामाजिक क्षेत्रातील मंडळी उपस्थितीत राहणार आहेत.

