सांगली / प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील शंभर दिवस उपक्रमांतर्गत सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका प्रशासनाने एक अनोखी स्पर्धा आयोजित केली आहे. महापालिकेचे १०० भूखंड लोक, संस्थासहभागातून विकसीत, सुशोभित करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रथम क्रमांकासाठी तब्बल ५ लाख रुपयांचे बक्षीस महापालिका देणार आहे. यशिय द्वितीय २ लाख, तृतीय १ लाख तर उत्तेजनार्थ बक्षिसांचा यामध्ये समावेश आहे.
स्पर्धेचे नियम व अटी मालमत्ता विभाग तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली. ते म्हणाले, सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांमधील महापालिकेच्या मालकीच्या १०० भूखंडांची यादी तयार करण्यात आली आहे. लोकसहभाग, संस्था, एनजीओ, खासगी संस्थांच्या माध्यमातून भूखंडांचे सुशोभीकरण करण्यात येईल.
यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. २६ जानेवारीपासून नांव नोंदणी सुरू आहे. उत्कृष्ठ भूखंड सुशोभित करणाऱ्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. यामध्ये प्रथम क्रमांकास ५ लाख, द्वितीय २ लाख तर तृतीय क्रमांकासाठी १ लाख रुपयांचे बक्षीस महापालिका देणार आहे. याशिय उत्तेजनार्थ व विशेष पारितोषिकेही दिली जाणार आहेत.

