उपविजेते पद 'kings इलेव्हन' कडे ; विजेत्यांना बक्षीस वाटप
मुंबई / प्रतिनिधी
महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीने छत्रपती संभाजीराजे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 'स्वराज्य चषक मुंबई २०२५' स्पर्धेचे १५ व १६ फेब्रुवारी रोजी चारकोप, मुंबई येेथील मैदानात आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यास पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव उपस्थित होते, यावेळी विजेत्या, उपविजेत्या संघास आणि उत्कृष्ट फलंदाजी व गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूस चषक व बक्षीसाचे वाटप करण्यात आले.
या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र स्वराज्य पक्ष युवक आघाडीचे मुंबई चे संतोष कदम, राहूल पाटील, सुनील यमकर, विनोद दबडे, सागर पुजारी, संदीप डिसले, तानाजी कदम यांनी यशस्वी नियोजन केले होते तर चषक सहकार्य चंद्रकांत चाळके यांनी केले. यावेळी पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव तसेच राज्य कार्यकारिणी सदस्य विजय कदम, विनोद परांडे, पांडुरंग बंडगर, दादाराव बोबडे, विक्रम कदम, अजित बाबळसुरे उपस्थित होते.

