yuva MAharashtra सह्याद्री कदम यांची महसूल सहाय्यक पदी निवड

सह्याद्री कदम यांची महसूल सहाय्यक पदी निवड

सांगली टाईम्स
By -
सह्याद्री कदम 

तासगाव / राजाराम गुरव

उपळावी (ता. तासगाव) येथील सह्याद्री चंद्रकांत कदम यांची मंत्रालय महसूल सहाय्यकपदी निवड झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगच्या‌ वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये त्यांनी यश संपादन केले. ग्रामीण भागातील कदम याची निवड झाल्याने उपळावीसह परिसरामथ्ये सर्वत्र कौतुक होत आहे.

सह्याद्री कदम याचे प्राथमिक व माध्यमीक शिक्षण ग्रामीण भागामध्ये झाले तर उच्च शिक्षण पुणे येथे झाले. कदम हे उपळावी गावच्या सरपंच आशाताई चंद्रकांत कदम  यांचे सुपुत्र आहेत. तर वडील चंद्रकांत कदम ही उपळावीचे सरपंच होते.

Tags: