yuva MAharashtra जिल्हाभरातील आरोग्य मित्र बेमुदत संपावर

जिल्हाभरातील आरोग्य मित्र बेमुदत संपावर

सांगली टाईम्स
By -

 


वेतन वाढ, रजा, बदलीच्या धोरणांसह प्रलंबीत मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

सांगली / प्रतिनिधी
महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेंतर्गत विविध रुग्णालयामध्ये कार्यरत असलेल्या आरोग्य मित्रांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे. वेतन वाढ, रजा, बदलीचे धोरण, ईएसआयसीचा लाभ, रजा, बदलीचे धोरणासह अन्य प्रलंबीत मागण्यांसाठी जिल्हाभरातील आरोग्य मित्रांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी धरणे आंदोलन केले. जिल्हाधिकारी श्री. अशोक काकडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघाचे आमदार रोहित पाटील यांनी आंदोलनास भेट दिली. कर्मचारृयांच्या मागण्यांबाबत चर्चा केली. दरम्यान मागण्यांबाबत सकारात्मक तोडगा निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील असा इशारा महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेने दिला आहे.

कॉ. हणमंत कोळी, कॉ. उमेश देशमुख, कॉ. दीपक आंबी, सविता मगदूम यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेंतर्गत जिल्हाभरातील ५८ विविध रुग्णालयामध्ये ५५ कर्मचारी आरोग्य मित्र म्हणून कार्यरत आहेत. त्यांना ११ हजार ४६५ रुपये इतके वेतन दिले जाते. याशिवाय अन्य लाभ कर्मचारयांना मिळत नाहीत. त्यामुळे कर्मचारयांनी मंगळवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुुरु केले आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी धरणे आंदोलन केले.

जिल्हाधिकारयांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये आरोग्य मित्रांना दरमहा २६ हजार रुपये वेतन द्यावे, वेतनामध्ये दरवर्षी १० टक्के वाढ करावी, पेट्रोल भत्ता द्यावा, आजारपण, किरकोळ, विशेष अधिकार, सणाच्या सुटटया लागू कराव्यात. सन २०१२ पासून डिसेंबर २०२१ पर्यंतचे अनुभव सर्टिफिकेट द्यावे, इतर जिल्हयात बदलीचे धोरण रदद करावे यासह अन्य मागण्यांचा यामध्ये समावेश आहे. आंदोलनामध्ये दीपक रास्ते, पतंगराव पाटील, वैभव पाटील, दुर्गेश वाईंगडे, विक्रम गुरव, सायली ठोकळे, अक्षदा दिंडे, रेश्मा खांडेकर, कविता कुलकर्णी, शिल्पा सावंत यांच्यासह जिल्हाभरातील जवळपास ३५ हून अधिक आरोग्य मित्र या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
Tags: