yuva MAharashtra तो तर औरंगजेबाची औलाद..!

तो तर औरंगजेबाची औलाद..!

सांगली टाईम्स
By -
छत्रपती उदयनराजे भोसले.

शिवरायांचे थेट वंशज छत्रपती उदयनराजे भोसले संतप्त

सांगली / प्रतीनिधी

अभिनेता राहुल सोलापूर कर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 'आग्र्याहून सुटका ' घटनेबाबत केलेल्या विधानाचे संतप्त पडसाद राज्यभरात उमटू लागले आहेत. छत्रपती शिवरायांचे थेट १३ वे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही सोलापूर्करवर कडक शब्दात टीका केली आहे. सोलापूरकर हा औरंगजेबाची औलाद असल्याचे वक्तव्य छत्रपती उदयनराजे यांनी केले आहे.

अभिनेता राहुल सोलापूरकरच्या विधानामुळे राज्यात शिवप्रेमीच्या मध्ये संतापाची लाट उसळली आहे. संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. महाराजांचे थेट वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही सोलापूरकरवर जहरी भाषेत टीका केली आहे. 

ADVT.

राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या विधानावर खासदार उदयनराजे भोसले कडाडले आहेत. ते म्हणाले, "राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या घोडचुकीला माफी नाही. शिवरायांनी कधीही तत्वाशी तडजोड केली नाही. राहुल सोलापूरकर ही औरंगजेबाची औलाद आहे. अशी प्रवृत्ती ठेचली पाहिजे. सोलापूरकरला गोळ्या घालून मारलं पाहिजे".