रविवारी परीक्षा; तयारी पूर्ण
सांगली / प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या राज्य परीक्षा परीषदेच्या पूर्व उच्च प्राथमिक परिक्षा (इयत्ता ५ वी ) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( ८ वी) रविवार ९ फेब्रुवारी होणार असून या परीक्षेची सर्व तयारी महापालिका शिक्षण विभागाकडून पुर्ण झाली आहे. सांगली महापालिका क्षेत्रात इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा ११ केंद्रावर आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षा ९ केंद्रावर होणार असल्याची माहिती महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी रामचंद्र टोणे यांनी दिली.
सांगली महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता ,उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी सुरु आहे. इयत्ता पाचवी, आठवीसाठी सकाळी ११ ते १२.३० यावेळेत प्रथम भाषा, गणित हे पेपर तर दुपारी २ ते ३.३० यावेळेत तृतीयभाषा,बुध्दिमता हे पेपर होणार आहेत. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण ११ परीक्षा केंद्रे आहेत,तर इयत्ता आठवीसाठी एकूण ९ परीक्षा केंद्रे आहेत. सर्व परीक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्त असणार आहे.
![]() |
| ADVT. |
या ठिकाणी गर्दी होणार नाही,याची दक्षता घेण्यात येणार आहे. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठीची परीक्षा केंद्रे आणि कंसात विद्यार्थी संख्या पुढीलप्रमाणे-आर.पी.पाटील हायस्कूल,कुपवाड(२३३), न्यू इंग्लिश स्कूल मिरज(१४१), सांगली हायस्कूल, सांगली(४३२), कांतीलाल पुरुषोत्तम शहा,सांगली (२१६), विद्यामंदिर प्रशाला, मिरज (२०७), आदर्श शिक्षण मंदिर किल्ला परीसर, मिरज (१४९), दडगे गर्ल्स हायस्कूल सांगली (२७५), मिरज हायस्कूल, मिरज (२४२), दामाणी हायस्कूल, सांगली (२१५), सिटी हायस्कूल,सांगली (३९३), आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूल सांगली (१६८),
इयत्ता ८ वीसाठी परीक्षा केंद्र आणि कंसात विद्यार्थी संख्या अनुक्रमे पुढीलप्रमाणे- एम.ए.उर्दू हायस्कूल सांगली -(१३६), आ.आ.उपाध्ये गर्ल्स हायस्कूल, कुपवाड (९७), अल्फोन्सा स्कूल, मिरज (११८), आदर्श शिक्षण मंदिर, मिरज(१०३), ज्युबिली कन्या शाळा, मिरज (२११), मालू हायस्कूल, सांगली (208), पटवर्धन हायस्कूल, सांगली (११५), पुरोहित कन्या शाळा, सांगली (१८९),राणी सरस्वती कन्या शाळा, सांगली (१२२), परीक्षेसाठी केंद्र समन्वयक यांचे मार्फत केंद्रभेटींचे नियोजन करण्यात आलेले आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अद्याप ज्या शाळा व पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट वेबसाईटवरून काढलेले नसेल त्यांनी काढून तात्काळ हॉल तिकीट ची प्रिंट काढून घ्यावे असे आवाहनही शिक्षण विभागाने केले आहे.

