yuva MAharashtra उमेश पाटलांचे राष्ट्रवादी पुन्हा..!

उमेश पाटलांचे राष्ट्रवादी पुन्हा..!

सांगली टाईम्स
By -


अजितदादांच्या उपस्थितीत देवगिरीवर घरवापासी

सांगली / प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीत स्थानिक नेतृत्वावर टीकेची झोड उठवत राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केलेल्या उमेश पाटील यांची अखेर घरवापसी झाली आहे. मुंबई येथे देवगिरी बंगल्यावर अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. यावेळी ज्येष्ठ नेते. दिलीप वळसे - पाटील यांचेसह राष्ट्रवादीचे अन्य मंत्री, नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना उमेश पाटील महणले, विधानसभा निवडणुकी पुर्वी मी माझ्या पक्षाच्या मुख्य प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला होता.परंतु इतर कुठल्याही पक्षात प्रवेश केला नव्हता. सोलापुर जिल्ह्यातील "मोहोळ विधानसभा" या राखीव मतदारसंघा मधील मातब्बर प्रस्थापित नेत्या सोबत टोकाचे मतभेद झाल्यामुळे मी नाईलाजाने पक्ष त्याग केला होता. मोहोळ विधानसभा मतदारसंघातील जनता अजितदादांच्या नव्हे तर तिथल्या प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात होती हे निवडणुकीच्या माध्यमातून सिद्ध करून दाखवण्याची आवश्यकता होती.

ADVT.

त्यामुळे मी व माझ्या सर्वपक्षीय सहका-यांनी मिळुन १५ दिवसात स्वतःचा उमेदवार देऊन (राजू खरे) विधानसभेला ३० हजार मताधिक्याने निवडून आणला. अजित दादांनी उमद्या मनाने स्वत:च्या पक्षाचा आमदार पडला तरी माझ्या जिगरबाज लढाऊ बाण्याचे कौतुक केले. मी दादांना कधी सोडले नव्हते. फक्त एक सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता इरेला पेटला तर अपराजित मातब्बर नेत्याला देखिल पराभूत करू शकतो हे सिद्ध करायचे होते. माझा देवगिरी येथे सर्व मंत्री,आमदार व पार्थ दादा पवार यांच्या उपस्थितीत अजितदादांच्या हस्ते झालेला पुन्हा पक्ष प्रवेश ही तांत्रिक बाब आहे. मी कधीही अजितदादांना सोडले नव्हते...फक्त थोडे दिवस पक्षातून रजा घेतली होती.

Tags: