yuva MAharashtra वंदना चंदनशिवे यांना मोठी संधी

वंदना चंदनशिवे यांना मोठी संधी

सांगली टाईम्स
By -
आमदार इद्रीस नायकवडी यांच्याकडून राष्ट्रवादी महिला अल्पसंख्यांक सांगली शहर जिल्हाध्यक्षपदी निवडीचे पत्र स्विकारताना वंदना चंदनशिवे.

राष्ट्रवादी महिला अल्पसंख्याक विभागाच्या सांगली शहर जिल्हा अध्यक्षपदी वर्णी 

सांगली / प्रतिनिधी 

सौ.वंदना शमूवेल चंदनशिवे यांची राष्ट्रवादी महिला अल्पसंख्यांक विभाग सांगली शहर जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार इद्रीसभाई नायकवडी यांच्या हस्ते वंदना चंदनशिवे यांना निवडीचे पत्र देण्यात आले. 

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष जमिल बागवान, माजी नगरसेवक अतहर नायकवडी, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ राधिका मिलिंद हारगे, माजी नगरसेविका सुवर्णा पाटील, माजी नगरसेविका आयेशा नायकवडी, सुनिता जगधने, मनीषा विभूते आणि महिला पदाधिकारी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Tags: