![]() |
| (प्रतिकात्मक फोटो) |
कर्जत मध्ये रंगणार महाराष्ट्र केसरीचा थरार ; आज अधिकृत घोषणा
सांगली / प्रतिनिधी
अहिल्यानगर येथे महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत अनेक अनुचित प्रकार घडले. अंतिम सामन्यात पंचांच्या चुकीमुळे चुकीचा निर्णय लागल्याचा आरोप होत असतानाच आता कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष )आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सोमवारी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
कुती हा महाराष्ट्राच्या मातीतील रांगाडा खेळ. 'महाराष्ट्र केसरी' राज्यातील मानाची कुस्ती स्पर्धा. गेल्या काही वर्षांपासून या स्पर्धेला वादाचे ग्रहण लागले आहे. अहिल्यानगर येथे नुकतीच महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेला पंचांच्या चुकीच्या निर्णयाचे गालबोट लागले. यावरून मोठा राडा झाला. उपमाहाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याने पंचांना लाथ मारली. या स्पर्धेनंतर अनेक आरोप - प्रत्यारोप झाले.
दरम्यान याबाबत बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले, देशभरात नावलौकिक असणाऱ्या 'महाराष्ट्र केसरी कुस्ती' स्पर्धेत झालेल्या गैरप्रकारामुळे पैलवानांसह राज्यातील तमाम कुस्ती प्रेमी नाराज असून स्पर्धा मेरिटनुसार व्हावी अशी त्यांची भावना आहे. त्यामुळं 'महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदे'च्या मान्यतेने कर्जतमध्ये 'महाराष्ट्र केसरी कुस्ती' स्पर्धा भरण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सोमवार १७ रोजी पुणे येथे अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
