yuva MAharashtra कबड्डी; 'युवक मराठा, शिवाजी व्यायाम' प्रथम

कबड्डी; 'युवक मराठा, शिवाजी व्यायाम' प्रथम

सांगली टाईम्स
By -


जिल्हा कब्बडी संघ निवड स्पर्धा संपन्न ; स्वराज्य फौंडेशनचे नेटके नियोजन 

तासगाव : प्रतिनिधी 

जिल्हा कबड्डी संघ निवडीसाठी ३५ वी किशोर किशोरी गट अजिंक्यपद व निवड स्वराज्य चषक कबड्डी स्पर्धा दि, ११ ते १३ अशी तीन दिवस येथे पार पडली. येथील स्वराज्य फाउंडेशनच्या वतीने या स्पर्धा घेंण्यात आल्या.आर आर पाटील तालुका क्रीडा संकुल मैदानावर सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने या स्पर्धा पार पडल्या.यावेळी जिल्ह्यातील मुलांचें ४५ संघ व मुलींचे २६ संघ सहभागी झाले होते.

 स्पर्धेसाठी चार कबड्डी मैदान तयार करण्यात आली होती.या स्पर्धेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.या स्पर्धेत मुलांच्यात युवक मराठा सांगली वाडीने प्रथम क्रमांक मिळवला,तर द्वितीय क्रमांक विश्वशांती कामेरी, तृतीय क्रमांक स्वराज्य फाउंडेशन तासगाव,चतुर्थ क्रमांक शिव सम्राट व्यायाम मंडळ वाजेगाव यांनी पटकावले. मुलींच्यात प्रथम क्रमांक शिवाजी व्यायाम संस्था अ वाळवा, द्वितीय क्रमांक राजाराम स्पोर्ट्स माधवनगर, तृतीय क्रमांक प्रोग्रेस आरग, चतुर्थ क्रमांक शिवाजी व्यायाम संस्था ब वाळवा  यांनी पटकवले.

दोन दिवस सुरू असलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील तज्ञ कबड्डीपटूंनी संघ निवडी केल्या.यावेळी सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ घोडके,महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष दिनकर  पाटील,सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह नितीन शिंदे, राष्ट्रीय खेळाडू नामदेव  पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू पोपट पाटील इस्लामपूर,सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक सुरेश पाटील,अनिल माने  तसेच जिल्ह्यातील आजी-माजी राष्ट्रीय कबड्डी खेळाडुनी भेट दिली.ही स्पर्धा स्वराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक सल्लागार समिती  यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली.

Tags: