yuva MAharashtra 'लव्ह जिहाद' विरोधी कायद्याला विरोधच..!

'लव्ह जिहाद' विरोधी कायद्याला विरोधच..!

सांगली टाईम्स
By -


केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा सरकारला घराचा आहेर 

शिर्डी / प्रतिनिधी 

राज्य शासनाने लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याच्या दृष्टीने पाऊले टाकण्यास सुरवात केली आहे. मात्र एनडीए सरकारमधील केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी या कायद्यास विरोध असल्याचे म्हंटले आहे.‘लव्ह जिहाद’ कायद्याला माझा विरोध आहे. हिंदू-मुस्लिम मुले-मुली एकत्र आले, की त्यास असे म्हणणे योग्य नाही, असे म्हणत त्यांनी राज्यातील महायुती सरकारला घरचा आहेर दिला आहे.

शिर्डी येथे ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, दलित-सवर्णसुद्धा एकत्र येतात. मुले-मुली एकत्र येतात, अशी लग्न होतात. हिंदू- मुस्लिम लग्न झाले, की त्याला ‘लव्ह जिहाद’ म्हणणे चुकीचे आहे. मी याला सहमत नाही. परंतु धर्मांतर होऊ नये म्हणून कायद्यात तरतूद असावी. जातीय सलोख्याबाबत बोलताना आठवले म्हणाले, ‘जातीय सलोखा न बिघडवता योग्य भूमिका असावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांना समान मानतात. 

त्यांनी सर्वांसाठी योजना आणल्या. त्याचा मुस्लिम समाजालाही फायदा होतो. मोदी सरकार अतिरेकी मुस्लिमांच्या विरोधात आहे. मुस्लिम समाजाच्या विरोधात नाहीत. मुलाने हिंदू धर्म स्वीकारावा अशीही तरतूद असावी. मी या परिस्थितीमधून गेलोय. मुले, मुली एकत्र आले आणि सहमतीने लग्न झाले, तर त्यात वावग काय, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Tags: