अश्वमेच स्पर्धेसाठी निवड ; गडचिरोली येथे होणार स्पर्धा
कवठेमहांकाळ / प्रतिनिधी
'ज्ञानगंगा घरोघरी' हे ब्रीदवाक्य घेऊन ज्ञानप्रसार करणारे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यास केंद्र कवठेमहांकाळ येथील महेश खरोसे व ओमकार राठोड या दोन विद्यार्थ्यांची गडचिरोली येथे होणाऱ्या अश्वमेध स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
कला शाखेच्या प्रथम वर्षात अध्ययन करणाऱ्या या खेळाडूंनी कोल्हापूर विभागात चमकदार कामगिरी करून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे दमदार कामगिरी केली.आणि गडचिरोली येथे होणाऱ्या अश्वमेघ स्पर्धेसाठी विद्यापीठ संघात त्यांची निवड झाली.महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.
या खेळाडूंना प्रा. डॉ. मयूर शिंदे, प्रा. निखील सुर्यवंशी यांचे मार्गदर्शन मिळाले. या खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब (तात्या) शिंदे, संस्थेचे सचिव सुदर्शन शिंदे, प्राचार्य डॉ. एम. के. पाटील, केंद्र प्रमुख विशाल शिंदे, केंद्र संयोजक प्रा. सतिश पाटील यांनी प्रोत्साहन देवून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
